क्रिप्टोकरन्सी संदर्भातील विधेयकामुळे क्रिप्टो बाजारपेठेत खळबळ; क्रिप्टोकरन्सीचे भाव गडगडले

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नवीन विधेयकानुसार भारतामध्ये सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. काही अपवाद वगळता सर्व चलनांवर बंदी घालून आभासी चलनासंदर्भातील व्यवहार नियंत्रित ठेवण्याचा सरकारचा हेतू आहे. हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे विधेयक ‘क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, २०२१’ या नावाने लोकसभेच्या विषयसूचीवर नमूद करण्यात आले आहे. आभासी चलनसंदर्भातील व्यवहारांचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

#cryptocurrancy #india #narendramodi #reservebank

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *